esakal | शिक्षक परिषदेचा 'या' कार्यालयाला 'टाळे ठोका' आंदोलनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

locked office

शिक्षक परिषदेचा 'या' कार्यालयाला 'टाळे ठोका' आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील (Maharashtra) अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाहनिधी पथक कार्यालयात मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी यांची वानवा आहे. तर सरकारचे लक्ष नसल्याने अनेक कार्यालयाची वीज तोडली (electricity stops) गेल्याने ती अंधारात आहेत, त्याचा सर्व परिणाम शाळा, शिक्षक आणि त्यांच्या वेतन आणि इतर कामकाजावर (impact on work) होत असल्याने त्याविरोधात शिक्षक परिषदेने (teachers union) राज्यभरात अधिक्षक वेतन कार्यालयाला टाळे लावा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ( Teachers union on strike because lack of employees and authorities in government office-nss91)

मुंबई ठाण्यातील अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाहनिधी पथक कार्यालयात मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत. त्याचे परिणाम कामकाजावर होत आहेत. वाशिम जिल्हा अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाहनिधी पथक कार्यालयांतर्गत 300 माध्यमिक शाळा असून एक महिन्यांपासून वीज तोडली आहे. त्यामुळे कार्यालयात विजेची टाॅर्च लावून कागदपत्रे चाचपडली जात आहेत. दीड वर्षांपासून वाशिमसह राज्यभरातील वीजबील, दूरध्वनी व इतर कार्यालयीन खर्चासाठी अनुदान मिळालेले नाही.

हेही वाचा: निवृत्तीनंतरच्या वेतनाच्या प्रतीक्षेतच ११ एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू!

या कार्यालयात आवश्यक तेवढे कर्मचारीही नाहीत. वेतन पथक अधिक्षक नाही. कनिष्ठ लेखाधिकारी वेतनपथक अधिक्षकांचा कार्यभार वाहत आहेत.त्यामुळे येथे कामकाज होत नाही. त्याचप्रमाणे अमरावती विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयाची वीज जोडणी 70 हजार वीज बील थकबाकी मुळे कापली होती पण कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून काही पैसे भरले आहेत. या विभागात शिक्षण उपसंचालक पद रिक्त असून कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव, अमरावतीचा अतिरिक्त प्रभार 800 किमी एवढ्या दुरच्या अंतरावरुन सांभाळत आहेत.अशीच अवस्था राज्यातील इतर अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाहनिधी पथक कार्यालयाची आहे, त्यामुळे सरकारने या सर्व अडचणी लक्षात घेऊन राज्यातील सर्व कार्यालयांची सुधारणा करावी आणि सर्व ठिकाणच्या रिक्त पदांची माहिती घेऊन ती भरावीत अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

loading image
go to top