
Video : 'महाराष्ट्र द्रोहींविरोधात हल्लाबोल'! महाविकास आघाडीकडून मोर्चाचे टिझर रिलीज
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महापुरुषांचा अपमान तसेच बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवर मुंबईत महाविकास आघाडीच्यावतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती दिली होती. आता या मोर्चाचे टिझर महाविकास आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. (MVA Morcha's teaser release)
हेही वाचा: Crime News : पुणे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उध्वस्त; लोनच्या नावावर व्हायची फसवणूक
महाविकास आघाडीने मुंबईत १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात महाविकास आघाडीसह घटकपक्षही सामील होणार आहे. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात जो काही कारभार सुरु आहे. यामध्ये महापुरुषांबाबत अपशब्द वापरण्याचं काम सुरु आहे. त्यांना कोणी आवरही घालत नाही. यामुळं जनतेत अस्वस्थता असून दोन दिवसांपूर्वी पुण्यात शाईफेकीची घटना झाली त्यानंतर वरळीला पुन्हा असाच प्रकार घडला. यावरुन जनतेत आक्रोश असल्याचं दिसून येत, असं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
हेही वाचा: Ashish Shelar : आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न; शेलारांची राऊतांवर सडकून टीका
महाविकास आघाडीच्या टीझरमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, यांची विधानं दाखवण्यात आली आहे. तसेच महापुरुषांचा अवमान सहन का करायचा, असा सवालही टीझरमधून उपस्थित करण्यात आला आहे.