esakal | राज्यात थंडीचा कडाका वाढणार; काही दिवसांत तापमानात घट होणार
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; काही दिवसांत तापमानात घट होणार

राज्यात परत एकदा मध्यम थंडीची लाट येण्याची शक्‍यता असून, 20 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; काही दिवसांत तापमानात घट होणार

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई  : राज्यात परत एकदा मध्यम थंडीची लाट येण्याची शक्‍यता असून, 20 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे. 

गेल्या आठवड्यापासून किमान तापमानात वाढ झाली आहे. उष्मा वाढला असून, उन्हाची काहिली वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. दिल्लीसह उत्तरेकडील पारा प्रचंड घसरला असून, राज्यातील अनेक भागांत शीत लहर येण्याची शक्‍यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकण शीत लहरीमुळे प्रभावित होणार आहे. 22, 23 जानेवारीनंतर पुणे, नाशिकचा पारा 12 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्‍यता आहे. किमान तापमानात घट होईल. मुंबई परिसरातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. 
राज्यात बदललेल्या वातावरणाचा काहीसा परिणाम जाणवू लागला असून, पारा घसरायला सुरुवात झाली आहे. मुंबईचे किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस झाले असून, गेल्या दोन दिवसांपासून गारवा वाढू लागला आहे. राज्यात सगळ्यात कमी तापमान गोंदिया येथे 8.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर ब्राह्मपुरी येथे 12.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यभरातील किमान तापमानात येत्या काही दिवसांत आणखी घट होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

आजचे किमान तापमान 

 • कुलाबा- 19.0 
 • सांताक्रुझ- 16.6 
 • ठाणे- 20.0 
 • डहाणू- 17.0 
 • मालेगाव- 17.6 
 • नाशिक- 14.5 
 • पुणे- 16.0 
 • बारामती- 15.9 
 • जालना- 19.0 
 • नांदेड- 17.4 
 • परभणी- 17.0 
 • सातारा- 16.7 
 • सांगली- 18.0 
 • कोल्हापूर- 20.0 
 • जळगाव- 18.0 
 • उस्मानाबाद- 15.4 
 • सोलापूर- 18.5 
 • औरंगाबाद- 6.7 
 • माथेरान- 16.8 
 • पणजी- 23.1 
 • अकोला- 17.0 
 • अमरावती- 15.5 
 • बुलडाणा- 18.2 
 • ब्राह्मपुरी- 12.2 
 • चंद्रपूर- 13.6 
 • गडचिरोली- 13.2 
 • नागपूर- 18.6 
 • वर्धा- 16.0 

The temperature will drop in a few days in state

-------------------------------------------

loading image