मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिन्यात होणार परीक्षा

तेजस वाघमारे
Wednesday, 2 September 2020

यंदा ही परीक्षा कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर गेली आहे. ही परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : दहावी बारावीत नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागामार्फत दहावी आणि बारावी परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थांची फेरपरीक्षा निकालानंतर तातडीने घेण्यात येते. परंतु यंदा ही परीक्षा कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर गेली आहे. ही परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था बंद करण्याचा विद्यापिठाचा डाव? सिनेट सदस्यांचा घणाघाती आरोप

दहावी, बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा निकालानंतर काही दिवसात आयोजित करण्यात येते. यंदा कोरोनामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल विलंबाने जाहीर झाले. मात्र कोरोनामूळे शाळांमध्ये क्वारंटाइन सेंटर असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू केलेल्या नाहीत. यामुळे या परीक्षा घेणे अशक्य आहे. या परीक्षा ऑक्टोबर मध्येही घेणे अशक्य असल्याचे, राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

चुकीला...माफी नाही! आर्थिक दंडासह दुकान बंद तर नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार

दहावीमध्ये एक लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थांची फेरपरिक्षा घेण्याचा कोणताही निर्णय मंडळाने जाहीर केलेला नाही. फेरपरीक्षा घेण्याबाबतचा कोणताही निर्णय मंडळाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे या परीक्षा कधी होतील, हे आता सांगता येणार नाही, असे मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tenth and twelfth re-examination postponed this year; Find out in which month the exam will be held