
PHOTOS: जामीन मिळूनही राणांच्या वाटेवर काटे; पाळाव्या लागणार 'या' अटी!

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या इशाऱ्यामुळे तुरुंगात जावं लागलं. अखेर आज त्यांची जामिनावर सुटका झाली. पण त्यांना काही अटी पाळाव्या लागणार आहेत. अन्यथा त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या अटी? जाणून घ्या...

राणा दाम्पत्य या प्रकरणाची कसलीही माहिती माध्यमांपुढे मांडू शकत नाही, माध्यमांना प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत.

या प्रकरणातल्या पुराव्यांसोबत छेडछाड करू शकत नाहीत.

ज्या कारणामुळे त्यांना अटक झाली, ती कृती ते परत करू शकत नाहीत.

तपास करणारा अधिकारी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलवेल तेव्हा हजर राहावं लागेल. तपास अधिकाऱ्यालाही २४ तास आधी राणा दाम्पत्याला नोटीस देणं बंधनकारक आहे.

रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांनाही प्रत्येकी ५० हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
Web Title: Terms And Conditions Of Bail Of Navneet And Ravi Rana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..