
डोंबिवली : हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. पालिका निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनीच शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हिंदी भाषा सक्तीच्या विरोधी मोर्चात ठाकरे बंधू एकत्र आल्याचे सर्वांना पहायला मिळणार होते. त्याआधीच सरकारने हा निर्णय रद्द केल्याने मोर्चा देखील रद्द करण्यात आला. यानंतर विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच ठाकरे पक्षाकडून ठाकरे बंधूंच्या एकीचे शक्ती प्रदर्शन बॅनरबाजीतून करण्यात आले आहे. ठाकरे केवळ नाव नाही, ती ताकद जी सरकारला ही झुकवतो असा मजकूर त्यावर लिहिण्यात आले आहे.