'ठाकरे सरकाची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच पैशाचीही मदत नाही'; प्रवीण दरेकरांची टीका

तुषार सोनवणे
Tuesday, 17 November 2020

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असून सरकार फक्त घोषणा करण्याचे काम करण्यात येत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

मुंबई - महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असून सरकार फक्त घोषणा करण्याचे काम करण्यात येत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

हेही वाचा  बंदुकीचा धाक दाखवून चोरांचा ज्वेलर्सच्या दुकानात शिरकाव, घटना CCTVमध्ये कैद

राज्यात कोरोना काळात नैसर्गिक आपत्तींनी सुद्धा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने अद्यापही त्याच भरपाई दिलेली नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. अतिवृष्टीच्या काळातही आम्ही पाहणी दौरे केले. त्यामुळे सरकारवर दबाब आला. मुख्यमंत्र्यांनीही एकदिवसीय दौरा केला. त्यानंतर तत्काळ मदत म्हणून जाहीर केलेल्या 10 हजार कोटींची रक्काम अद्याप लोकांना मिळालेली नाही. दिवाळी अगोदर 2 हजार कोटींचे वाटप होईल अशी घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. 

हेही वाचा - भिवंडीतल्या भावाकडून बिहारमध्ये राहणाऱ्या बहिणींना भाऊबीजेचं अनोखं गिफ्ट

परंतु पाच पैसेदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम ठाकरे सरकार करीत आहे. दोन हजार कोटी तर लगेच द्याच परंतु एकूण 10 हजार कोटींची रक्कम देखील जुजबी आहे. तत्काळ वाढवून द्या असे दरेकर यांनी म्हटले आहे.

-----------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government does not provide money to farmers affected by heavy rains Criticism of Praveen Darekar