
डोंबिवली : गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातच आजपासून घरगुती पीएनजी आणि वाहनांच्या सीएनजी गॅसची दरवाढ झाल्याने नागरिक या भाववाढीने हैराण झाले आहेत. या दर वाढी विरोधात दिव्यात शिवसेना ठाकरे गटाने अनोखे आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला. स्टेशन परिसरात रस्त्यावर चूल मांडत भाकरी थापून यावेळी आंदोलन कर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा बाजी केली.