ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने लावला पालीच्या तीन नवीन प्रजातींचा शोध

New species of sail
New species of sailsakal media

मुंबई : गोल बुबुळ, भरपूर खवले आणि शरीरावर उंचवटे असणाऱ्या पालीच्या दुर्मिळ प्रजाती (species of sails) शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे (Tejas Thackeray), अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी नव्याने तीन पालींचा शोध लावला आहे. त्यांचा शोध निबंध जर्मनीमधून (Germany) प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ (vertebrate zoology) आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.

New species of sail
शिवसेना नेत्यांशी संबंधितांच्या घरावर आयकर खात्याचे छापे

नव्याने शोध लागलेल्या पालीच्या तिन्ही प्रजाती ‘गोल बुबुळा’च्या जातीतील आहे. निमास्पिस टायग्रीस, निमास्पिस सक्लेशपुरेनसिस आणि निमास्पिस विजयाई अशा जातीच्या पालींचा त्यात समावेश आहे. अशा जातीच्या प्रजाती भारतासह श्रीलंका, म्यानमार, थायलंड, सुमात्रा आणि त्याच्या जवळपासच्या बेटांवर आढळून येतात. जगभरात त्यांच्या १०० पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. भारतात ६८ प्रजातींची नोंद आतापर्यंत झालेली आहे. शरीरशास्त्र आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या पाली वेगळ्या असल्याचे सिद्ध झाले. तज्ज्ञांनी त्यासंबंधीची पुष्टी केल्यावर सोमवारी (ता. ७) हा संशोधन निबंध ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ पत्रिकेतून प्रकाशित करण्यात आला असल्याची माहिती संशोधक तेजस ठाकरे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर काही छायाचित्रे प्रसारित करत दिली आहे.

नव्याने शोधण्यात आलेल्या तीन पालींमध्ये निमास्पिस टायग्रीस, निमास्पिस सक्लेशपुरेनसिस आणि निमास्पिस विजयाई जातींच्या पालींचा समावेश आहे. ‘निमास्पिस टायग्रीस’ प्रजाती ‘मैसुरेंसिस’ गटातील असून ती कर्नाटकातील चिकबल्लापूर जिल्ह्यातील कैवारा या ठिकाणी जून २०१९ मध्ये आढळून आली होती. या प्रजातीच्या नरांमध्ये वाघासारखी पट्टेदार रचना दिसून आली. म्हणून तिचे नामकरण ‘निमास्पिस टायग्रीस’ असे करण्यात आले. ही प्रजाती झुडपी प्रकारच्या जंगलात ग्रॅनाईटच्या खडकावर समुद्रसपाटीपासून साधारण ९१० मीटर उंचीवर आढळून आली असल्याचे संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले.

New species of sail
ठाण्यात महिला दिन उत्साहात; बाईकस्वार महिलांचा उत्साहपूर्ण सहभाग

‘गोवाएनसिस’गटातील ‘निमास्पिस सक्लेशपुरेनसिस’ प्रजाती हस्सन या जिल्ह्यातील सक्लेशपूर गावात जून २०१९ मध्ये आढळून आली. गावाच्या नावावरून तिचे नाव ‘निमास्पिस सक्लेशपुरेनसिस’ असे करण्यात आले. ही प्रजातीही अर्धसदाहरित प्रकारच्या जंगलात नदीच्या कडेने, झाडाच्या खोडांवर आणि घरांच्या भिंतीवर समुद्रसपाटीपासून साधारण ८५० मीटर उंचीवर आढळून आली आहे.

तिसरी प्रजाती कोडागू जिल्ह्यात डिसेंबर २०२१ मध्ये आढळून आली. ती गोवाएनसिस गटातील असून, तिचे नामकरण ‘निमास्पिस विजयाई’ असे करण्यात आले. त्याबद्दल अधिक माहिती देताना संशोधकांनी सांगितले, की पहिल्या भारतीय सरीसृप महिला संशोधिका जे. विजया (१९५९-१९८७) यांनी कासवांवर केलेल्या संशोधन कार्याचा गौरव म्हणून ‘निमास्पिस विजयाई’ नाव देण्यात आले आहे. सदर प्रजाती ही कॉफीच्या मळ्यांनी वेढलेल्या घरांच्या भिंतींवर समुद्रसपाटीपासून साधारण १२५० मीटर उंचीवर आढळून आली.

गोल बुबुळाच्या ७१ पाली

पालीच्या तिन्ही प्रजाती पायांवरील ग्रंथींची व त्यामधील विनाग्रंथी खवल्यांची संख्या, शरीरावरील उंचवट्यांची संख्या, रंग, इतर शारीरिक वैशिष्ट्ये आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर नवीन असल्याचे सिद्ध झाले आहे. नव्या संशोधनामुळे भारतातील गोल बुबुळाच्या पालींची संख्या आता ७१ वर गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com