नवी मुंबई : सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला अटक; ठेकेदाराकडे मागितली लाच | Cidco news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested
नवी मुंबई : सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला अटक; ठेकेदाराकडे मागितली लाच

नवी मुंबई : सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला अटक; ठेकेदाराकडे मागितली लाच

नवी मुंबई : ठेकेदाराकडे (bribe from contractor) लाच मागितल्या प्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक (thane ACB) विभागानं सिडकोच्या एका कार्यकारी अभियंत्याला बेड्या ठोकल्या आहेत. ठेकेदाराकडून ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं. कल्याण पाटील (executive engineer arrested) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. बेलापूरच्या रायगड भवन येथील सिडको एका कार्यालयात पाटील क्लास वन अधिकारी म्हणून काम पाहतात. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम २०१८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Thane Anti Corruption Bureau arrested cidco executive engineer in bribery crime)

हेही वाचा: पालघर: ज्वेलर्स मालकासह पत्नी, मुलाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

याबाबत सविस्तर वृत्त असं की, "एका ठेकेदाराने सिडकोचे अभियंता कल्याण पाटील याच्याविरोधात ३ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ जानेवारीला तक्रार दाखल केली होती. ठेकेदाराने खारघर रेल्वे स्टेशनचे आणि स्कायवॉकचे सॅनिटायझेशन तसंच उड्डाणपुलाचं रंगरंगोटीच्या कामाचा करार केला होता. त्या कामाची सहा थकीत बिलं अदा करण्यासाठी पाटीलने ठेकेदाराकडे लाच मागितली होती." अशी माहिती ठाणे लाचलुचपत विभागाच्या उप अधिक्षक माया मोरे यांनी दिलीय.

पाटीलने ठेकेदाराकडून केलेल्या कामांची तीन बिलं अदा करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच यापूर्वीही घेतली होती. त्यानंतर उर्वरीत बिल देण्यासाठी पुन्हा ३० हजार रुपयांची मागणी पाटीलने ठेकेदाराकडे केली असल्याचा आरोप तक्रारदाराने पाटीलवर केलाय. दरम्यान, ठाणे एसीबीचे पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांनी दिलेली माहिती अशी की, "ठेकेदाराने केलेल्या तक्रारीचा आम्ही तपासणी केली. त्यानंतर बेलापूरच्या एमजीएम रुग्णलयाच्या मागे आरोपी पाटीलला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाटील त्याच्या वैयक्तिक कारमध्ये आला. त्यावेळी कारमध्ये ठेकेदाराकडून ३० हजारांची लाच घेताना पाटीलला एसीबीने रंगेहाथ पकडले आणि त्याला अटक केली."

Web Title: Thane Anti Corruption Bureau Arrested Cidco Executive Engineer In Bribery Crime Navi Mumbai Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top