ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास धोकादायक; देहविक्रीसाठी तृतीयपंथीयांचे अड्डे | Transgender prostitution | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prostitution

ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास धोकादायक; देहविक्रीसाठी तृतीयपंथीयांचे अड्डे

वाशी : ठाणे-बेलापूर मार्गावरील (thane-Belapur) रबाले, घणसोली तर महापे-शिळफाटा (Mahape-shilphata road) मार्गावर रात्री तृतीयपंथी देहविक्रय (transgender's prostitution) करत असल्याचे निदर्शनास येत आहे. रात्री ८ वाजल्यांनतर त्या ठिकाणी जागोजागी तृतीयपंथी उभे राहिलेले दिसतात. त्यामुळे रिक्षाचालकांसह खासगी वाहनांतून काही जण या परिसरात येतात. त्यामुळे गृन्हेगारी कृत्ये (criminal offence) घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणात NCBचं थोबाड फुटलंय!

ठाणे-बेलापूर मार्ग तसेच महापे- शिळफाटा मार्गावर देहविक्री करणाऱ्या तृतीयपंथींचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ट्रक टर्मिनल आवार, आडोशाला वा रस्त्याच्या बाजूला झाडा-झुडपांत, रेल्वेच्या भिंतींशेजारी हे तृतीयपंथी देहविक्रीसाठी उभे असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी अशा प्रकारांना या भागात ऊत येतो. त्यामुळे एकट्यादुकट्या वाहनचालकाला गाठून त्याच्याकडील मौल्यवान वस्तू लुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

याआधी चालकांना लुटल्याचे प्रकार शीव-पनवेल महामार्गावर सानपाडानजीक घडले आहेत. एपीएमसीमधील मॅफको मार्केट येथे देहविक्रीच्या अड्ड्यावरून तृतीयपंथींच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारीही झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.

loading image
go to top