टिटवाळा : येथील बनेल परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने आधी तिच्या डोक्यात टीव्ही फोडला आणि त्यानंतर हंड्याने बेदम मारहाण करीत तिचा खून केला..मृत महिलेचे नाव सारिका ऊर्फ रुक्सार असून, आरोपी पतीचे नाव सतीश काळुराम वाघे ऊर्फ गुड्डू (२१) असे आहे. पत्नीवर संशय असल्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी झालेल्या वादाने अचानक हिंसक रूप धारण केले. रागाच्या भरात सतीश याने घरातील टीव्ही उचलून पत्नीच्या डोक्यात मारला. त्यानंतरही संताप न शमल्याने त्याने घरातील हंड्याने तिच्यावर वार केले..Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच.या भीषण मारहाणीत सारिका गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून परिसरातील नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास कल्याण तालुका पोलीस करीत आहेत..अल्पवयीन मुलीचा निकाह; गुन्हा दाखलमुंब्रा परिसरातील सामूहिक निकाह सोहळ्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला आहे. याप्रकरणी आयोजक, काझी, मुलीची आई, संबंधित आणि शाळेच्या मुख्याध्यापकांसह सात जणांविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजसेविका रिदा रशिद यांनी तक्रार दिली असून, संबंधित मुलगी विवाहावेळी अल्पवयीन असल्याचे आधार कार्डावरून स्पष्ट झाले. हुंडा दिल्याचाही आरोप करण्यात आला असून, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील तपास सुरू आहे..Thane News: खाद्यतेलाआड डिझेल तस्करी! कसारा, खारेगाव टोलनाक्यावर पोलिसांची कारवाई.कल्याण कारागृहात कैद्याचा मृत्यूआधारवाडी मध्यवर्ती कारागृहातील एका विचाराधीन कैद्याचा छातीत दुखणे आणि चक्कर आल्याने मृत्यू झाला. अजय आनंदजी कल्हन ऊर्फ हेलम रवींद्र कपाडिया (५०) असे मृत कैद्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांना अचानक त्रास सुरू झाल्यानंतर ते बरॅकमध्ये कोसळले. जेल कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. खडकपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.