कोरोनाचा धोका वाढला; ठाणे जिल्हात 36 नवीन रुग्णांची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 एप्रिल 2020

रविवारी ठाणे शहरात, मीरा भाईंदरमध्ये 13 आणि कल्याण-डोंबिवलीत दोन असे 36 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा 389 वर पोहोचला आहे. 

ठाणे ः ठाणे महानगर पालिकाक्षेत्रासह मीरा भाईंदर आणि कल्याण- डोंबिवली पालिकाक्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत वाढत होताना दिसत आहे. त्यामुळे या तिन्ही शहरात चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी ठाणे शहरात, मीरा भाईंदरमध्ये 13 आणि कल्याण-डोंबिवलीत दोन असे 36 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा 389 वर पोहोचला आहे. 

महत्त्वाची बातमी ः मुंबईत कोरोना बाधित आणखी वाढले...वाचा बातमी 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या 389 वर पोहोचली असून आता पर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रविवारी ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत एकाच दिवशी नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून कोरोनाबाधीतांची संख्या 140 वर पोहोचली असून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मीरा भाईंदरमध्ये 13 नवीन रुग्ण आढळून आल्याने 82 इतकी संख्या झाली आहे. तर, कल्याण डोंबिवली क्षेत्रात दोन नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील रुग्णांचा आकडा 75 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे रविवारी या तीन शहरांव्यतिरिक्त नवी मुंबईम, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण आणि भिवंडी या शहरांमध्ये एकही नव्या रुग्णाची नोंद करण्यात आली नाही.

हेही वाचा ः सावधान : किराणा दुकानांत मिळतोय निकृष्ट माल 

त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपयायोजना करून देखील कोरोर्नाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रशासनाकडून लोकांना वारंवार घरी राहा, विनाकारण गर्दी करून नका, घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, या आवाहनाला नागरिकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे बाजारत व भाजी मार्केट मध्ये होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे. तसेच दुसरीकडे, जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरू लागली आहे.  

  thane distric corona positive 36 new cases


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane distric corona positive 36 new cases