esakal | ठाणे जिल्ह्यातील संकट आणखी गडद! 24 तासांत 142 नवे रूग्ण; वाचा सविस्तर आकडेवारी
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे जिल्ह्यातील संकट आणखी गडद! 24 तासांत 142 नवे रूग्ण; वाचा सविस्तर आकडेवारी

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांच्या आकड्याचा आलेख वाढत जात आहे. गुरुवारी (ता. 7) जिल्ह्यात बाधितांची सर्वाधिक 142 इतकी नोंद करण्यात आली असून ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेत प्रत्येकी एक अशा दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील संकट आणखी गडद! 24 तासांत 142 नवे रूग्ण; वाचा सविस्तर आकडेवारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांच्या आकड्याचा आलेख वाढत जात आहे. गुरुवारी (ता. 7) जिल्ह्यात बाधितांची सर्वाधिक 142 इतकी नोंद करण्यात आली असून ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेत प्रत्येकी एक अशा दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1 हजार 655 तर, मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. 

कोरोनाच्या थैमानात वरळी कोळीवाड्यातून आली 'ही' गुडन्यूज! वाचा बातमी सविस्तर​

गुरुवारी ठाणे महानगर पालिकाक्षेत्रात सर्वाधिक 64 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झालीची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील बाधितांचा आकडा 560 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 21 इतका झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 44 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 484 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 8 झाला आहे. कल्याण- डोंबिवली पालिका क्षेत्रात 20 नव्या रुगांची नोंद झाल्याने तेथील बाधितांचा आकडा 253 झाला. तसेच मीरा भाईंदरमध्ये 6 रुग्ण आढळून आल्याने तेथील बाधितांचा आकडा 202 झाला. अंबरनाथ मध्ये देखील 1 नवा  रुग्ण आढळला असून तेथील संख्या  12 झाली आहे. तसेच ठाणे ग्रामीण भागात 7 नव्या बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील आकडा 65 वर गेला आहे.

loading image
go to top