ठाण्यातील पाच लाख नागरिकांना सात-बारा घरपोच

जिल्हा प्रशासनाकडून मोहिमेची अंमलबजावणी सुरू
sat-bara
sat-barasakal media
Updated on

ठाणे : जिल्ह्यातील सुमारे पाच लाख २४ हजार ४९१ खातेदारांना शेतीचा सात-बारा (satbara utara) मोफत घरपोच (free home delivery) देण्याची मोहीम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (rajesh narvekar) यांनी सांगितले. मागील आठ दिवसांत ९,५०० खातेदारांना (Account holder)) सात-बारा वितरीत केल्याचेही त्यांनी सांगितले.

sat-bara
नवी मुंबईला डबल ए प्लस स्टेबल मानांकन; सलग सातव्यांदा मानकरी

२ ऑक्टोबरपासून ही मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. आतापर्यंत ठाणे तालुक्यात ७००, कल्याण २०००, मुरबाड १८००, अंबरनाथ १७००, मिरा-भाईंदर ४००, शहापूर १२००, भिवंडी १७०० असे सातही तालुक्यांत एकूण ९,५०० सात-बारा वितरीत केले आहेत. महिनाअखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मोफत सात-बारा उताऱ्यांचे वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी क्षेत्रीय प्रशासनाला दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यात एकूण सहा लाख ४५ हजार १७१ सात-बारा असून त्यापैकी पाच लाख चार हजार ९१ शेतीचे सात-बारा आहेत. डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमीअंतर्गत विकसित केलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेखविषयक शेतजमिनीचा सात-बारा अद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये संबंधित तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तलाठ्यांमार्फत सात-बारा वाटपास सुरुवात झाल्याचे महसूल शाखेचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

"शेतकऱ्यांनी मोफत डिजिटल स्वाक्षरी सात-बारा वाटप मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. वाटप केलेल्या सात-बारामध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असल्यास खातेदाराचा अभिप्राय घेऊन त्याची पूर्तता केली जाईल. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा."
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com