esakal | ठाण्यातील 'छमछम'ला महापालिकेचा दणका, 'या' बारला ठोकले टाळे!
sakal

बोलून बातमी शोधा

Dance-Bar

ठाण्यातील 'छमछम'ला महापालिकेचा दणका, 'या' बारला ठोकले टाळे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोना (Corona) या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने टाळेबंदी लागू केली आहे. या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे आजही अनेक आस्थापनांना बंद ठेवण्यात आले आहेत. असे असतांना, दुसरीकडे मात्र, ठाणे शहरातील डान्स बार (Dance Bar) तेजीत सुरु असल्याचे दिसून आले. या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत, डान्स बार सुरू प्रकरणी दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांसह दोन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर (Thane Police) कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर, मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल पंधरा बारवर ठाणे महापालिकेने (Thane Municipal) सीलबंदची कारवाई केली आहे. ही कारवाई शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आली असून या कारवाईमुळे ठाणे शहरातील डान्स बार चालकांचे धाबे दणाणले आहे. ( Thane Fifteen Bars Sealed by Thane Municipal action Against Police too- nss91)

मागील दीड वर्षापासून राज्यभरासह ठाणे जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापलिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग अहोरात्र झटत असून दुसरीकडे टाळेबंदी देखील करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे शहरात या टाळेबंदीच्या काळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनके आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. असे असतांना हि ठाणे शहरात ऑर्केस्ट्रा बार ऍण्ड रेस्टॉरंट (डान्स) सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना मिळताच त्यांनी याबाबत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना याप्रकरणी सखल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा: शिक्षकांना खुशखबर , सप्टेंबर महिन्यात होणार 'TET' परीक्षा

या चौकशीनंतर ठाणे शहर दलातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उग्र्ण्यात आला. त्यातील नौपाडा आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षकांना निलंबित करून मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. तसेच नौपाडा व वर्तकनगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना नियंत्रण कक्षेत संलग्न केले आहे. त्याचबरोबर संबंधित ऑर्केस्ट्रा बार ऍण्ड रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती पोलिसांनी देता, ठाणे महापालिकेला ऑर्केस्ट्रा बार ऍण्ड रेस्टॉरंट सीलबंद करण्याची कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले होते.

त्यात ठाणे महापालिकेने त्या- त्या प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त आणि त्यांच्या पथकाना कारवाई करण्या संदर्भात सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारी ठाणे शहरातील विविध ठिकाणी असलेले 15 बार सीलबंद केल्याची माहिती महापालिकेने दिली. यामध्ये तलावपाळी येथील आम्रपाली,तीन पेट्रोलपंपवरील अँटिक पॅलेस, उपवन येथील नटराज व सुर संगम, सिने वंडर येथील आयकॉन, कापूरबावडी नाक्यावरील स्वागत व सनसिटी,  नळपाडा मधील नक्षत्र, पोखरण रोड नंबर 2 येथील के नाईट,ओवळा नाक्यावरचा स्टार लिंग व मैफिल, वागळे येथे सिझर पार्क, नौपाड्यात मनीष, मॉडेला नाका येथील अँजेल आणि भाईंदरपाडा येथील खुशी अशा बारवर सीलबंदची कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट केले. दरम्यान, ठाणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांकडे व लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असतानाही शहरात डान्स बार सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

loading image