

DFO Roshan Rathod Driver
esakal
Thane News: शासकीय सेवेत अनेक कर्मचारी आपले संपूर्ण आयुष्य कर्तव्य बजावत घालवतात. मात्र, त्यांच्या निष्ठेची आणि समर्पणाची योग्य दखल घेतली गेली, तर तो क्षण आयुष्यभरासाठी स्मरणात राहतो. ठाणे वनवृत्तात नुकतीच अशीच एक हृदयस्पर्शी घटना घडली असून, ती सध्या वन विभागासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरली आहे. विभागीय वन अधिकारी रोशन राठोड यांनी स्वतः शासकीय वाहन चालवत आपल्या वाहनचालकाला घरी सोडत, सेवानिवृत्तीचा निरोप दिल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे हा प्रसंग केवळ एक निरोप समारंभ न राहता, शासकीय व्यवस्थेतील मानवी मूल्यांचे जिवंत उदाहरण ठरला.