
ठाण्यात घोडबंदर रोडवर नागला बंदर इथं भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. कॅडबरी जंक्शनजवळ तरुणी दुचाकीवरून जात होती. तेव्हा डंपरखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. तिचा मृतदेह घटनास्थळी बराच वेळ पडून होते. लहान भाऊ आणि आई आल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून नेण्यात आला. गजल टुटेजा असं तरुणीचं नाव आहे.