ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलने २०० नर्सेसना नोकरीवरुन काढलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs

ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलने २०० नर्सेसना नोकरीवरुन काढलं

ठाणे: ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयाच्या (Thane global hospital) आवारात गोंधळाचं वातावरण आहे. इथे काम करणाऱ्या नर्सेसचं आंदोलन सुरु आहे. या नर्सेसना अचानक नोकरीवरुन कमी करण्यात आलं आहे, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाचं वातावरण आहे. (Thane global hospital sack two hundread nurses from job)

अचानक नोकरीवरुन कमी केल्यामुळे या नर्सेसपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात दुसरी नोकरी कुठे मिळणार? असा प्रश्न या परिचारिकांसमोर निर्माण झाला आहे. ग्लोबल रुग्णालयात या नर्सेस कंत्राटी पद्धतीने काम करत होत्या.

हेही वाचा: कॉलेजकडून भरमसाठ फी घेतली जातेय? मग ही बातमी वाचाच

काल मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य कंत्राटदाराने नर्सेसमध्ये व्हॉट्स अ‍ॅपवरुन एक मेसेज पाठवला. त्यामध्ये तुम्हाला नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे, असा मेसेज पाठवला होता. या कंत्राटदाराने २०३ नावाची एक यादी टाकली होती. त्या सर्वांना नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे. सध्या ग्लोबल रुग्णालयात फक्त १०० लोक कामावर आहेत. पण त्यांचा सुद्धा पगार निम्म्याने कमी करण्यात आलाय. रुग्ण नसल्यामुळे हॉस्पिटल तोट्यात असल्याचे कारण या कंत्राटदाराने दिले होते.

loading image
go to top