Sushma Andhare : म्हणून आम्हाला ठाण्याच्या निकालाची चिंता नाही

ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला नाही तर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असून आम्ही त्यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत, त्यामुळे ठाण्याच्या निकालाची चिंता आम्हाला नाही.
Sushma Andhare
Sushma Andharesakal

ठाणे - ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला नाही तर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असून आम्ही त्यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत, त्यामुळे ठाण्याच्या निकालाची चिंता आम्हाला नाही असे मत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. त्या ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारीवर कोणी बोलत नाही, उलट ठाण्यासह इतर ठिकाणी गुंडगिरी, गुन्हेगारी वाढत आहे. निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. ठाण्याची गुन्हेगाराचा रेषो देखील चढा असतांना त्यावर काहीच होत नाही. या उलट स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केला जात असून त्याच्या विरोधात ही संवाद यात्रा असल्याचेही सांगितले.

शासन आपल्या दारी हा निव्वळ भुरटेपणा असल्याचे सांगत, इथे महिलांना घरे मिळालेली नाही, योजना पोहचलेल्या नाहीत, अनेक गांवामध्ये रस्ते, वीज, पाणी नाही, त्यामुळे शासन आपल्या दारी करदात्यांच्या पैशांची लुट असल्याचेही त्या म्हणाल्या.

बारामतीमधील शासन आपल्या दारीच्या कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांना डावललेल्या असल्याच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, त्यासाठी मोठेपणा असावा लागतो, तो मोठेपणा शरद पवार यांनी दाखवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमत्रंण दिल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत लावण्यात आलेल्या एसआयटी बाबत त्यांना विचारले असता, त्यातील वयक्तीक शिविगाळी बाबत मी समर्थन करणार नाही.

परंतु एसआयटी लावायची असेल तर मग नितेश राणे यांच्यावर होणार का चौकशी?, लाठी हल्याची होणार का चौकशी असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इथे निष्ठावान शिवसैनिकांवर दबाव टाकला जात आहे. त्यात रविंद्र वायकर यांच्याबाबतही दबाव टाकला जात आहे. त्यात उद्या ते भाजपमध्ये गेले तर मात्र हिसाब देना पडेगा म्हणणाºया किरीट सोमय्या यांना माघार घ्यावी लागणार असल्याची टिकाही त्यांनी केली.

नगरसेवक गेले ते केवळ बिले काढण्यासाठी

ठाणे शहरातील निष्ठावान शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. केवळ नगरसेवक गेले ते देखील केवळ बिले काढण्यासाठी गेले असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यातही येत्या काळात नगरसेवक देखील पुन्हा येऊ शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर खाली उतरवू शकतो

श्रीकांत शिंदे यांना कोणी निवडून दिले. प्रकाश सुर्वे यांनी आम्ही निवडून दिले. उदय सामंतांना मंत्री बनविले. त्यामुळे आम्ही तुम्हाला घडवू शकतो तर खाली सुध्दा उतरवू शकतो असा इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला. संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचा कौल आम्ही घेत आहोत, ते या सत्ताताधाºयांना वैतागले आहेत.

साधा रिक्षावाला ही जागा दाखवून देईल

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा देखील त्यांनी खरपुस समाचार घेतला. म्हस्के यांना २४ तास बॉडीगार्ड लागतात, त्यात त्यांच्यावर बोलण्याइतके ते इतके काही मोठे झालेले नाहीत. केवळ त्यांच्यावर वरदहस्त असल्यानेच ते बोलत असून त्यांच्या डोक्यावरील हात काढला तर आमचा साधा रिक्षावाला देखील त्यांना त्यांच्या जागा दाखवून देईल अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com