esakal | कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दोन ऑर्केस्ट्रासह पाच बार सील; ठाणे पालिकेची धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दोन ऑर्केस्ट्रासह पाच बार सील; ठाणे पालिकेची धडक कारवाई

 सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याची गय केली जाणार नाही हा इशारा ठाणे महापालिकेने प्रत्यक्षात खरा करून दाखवला आहे.

कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दोन ऑर्केस्ट्रासह पाच बार सील; ठाणे पालिकेची धडक कारवाई

sakal_logo
By
हेमलता वाडकर

ठाणे  - सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याची गय केली जाणार नाही हा इशारा ठाणे महापालिकेने प्रत्यक्षात खरा करून दाखवला आहे. पालिकेने केलेल्या धडक कारवाईत दोन  ऑर्केस्ट्रा   बारसह एकूण पाच  बार सील ठोकण्यात आले आहे. तर एका दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील  दोन  ऑर्केस्ट्रा   बारसह एकूण पाच बार सील केले. 

  • - नौपाडा प्रभाग समितीमधील  एलबीएस मार्गा वरील शिल्पा लेडीज बार सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला.
  •         -  माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडू येथील सन सिटी या  ऑर्केस्ट्रा  बारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार  सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले.
  • - नौपाडा येथील एका दुकानदारावरही कोविड नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हे दाखल होणार 
     केवळ आस्थापना सील कारण्यापर्यंत हि कारवाई मर्यादित राहणार नाही. तर आधी दिलेल्या  इशाऱ्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरु केली आहे.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

thane marathi latest news Five bar seals with two orchestras violating the corona rules live updates