ठाण्यात बार चालकांकडून कोविड नियम धाब्यावर! 5 बार व 1 वाईन शॉप सील

ठाण्यात बार चालकांकडून कोविड नियम धाब्यावर! 5 बार व 1 वाईन शॉप सील

ठाणे -  सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापर या त्रिसूत्री  नियमांना ठाण्यातील रेस्टॉरंट बारवाल्यानी धाब्यावर बसवल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. कडक कारवाईच्या नोटिसा बजाऊनही कोविड नियम मोडणाऱ्या शहरातील 6 बारना मंगळवारी टाळे ठोकल्यानंतर पालिकेने दुसऱ्या दिवशीही कारवाईचा बडगा उगारात आणखी 5 बार व 1 वाईन शॉप सील केले आहे. महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
          कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून त्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतंर्गत वागळे प्रभाग समितीमधील धमाल बार अँन्ड रेस्ट्रॉरंट सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव यांनी सील केला. 

वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत सुरसंगीत बार अँन्ड रेस्ट्रॉरंट, स्वागत बार अँन्ड रेस्ट्रॉरंट आणि नक्षत्र बार अँन्ड रेस्ट्रॉरंट हे तीन बार आणि रेस्टॅारंटस सहाय्यक बाळासाहेब चव्हाण यांनी सील केले. मुंब्रा प्रभाग समिती मधील १ रेस्ट्रॉरंट सहाय्यक आयुक्त सागर सांळुंखे, तर लोकमान्य सावरकर प्रभाग समिती मधील पांडुरंग वाईन शॉप सहाय्य्क आयुक्त कल्पित पिंपळे यांनी सील केले. सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

thane marathi news covid rules from bar drivers in Thane latest updates 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com