बुलेट ट्रेनसाठी १५२ झाडे तोडणार; शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bullet Train

बुलेट ट्रेनसाठी १५२ झाडे तोडणार; शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष

मुंबई : ठाणे महापालिकेने (Thane municipal) बुलेट ट्रेनसाठी (bullet train) दिवा येथील भूखंड (Diva land) देण्यास होकार दिल्यानंतर आता वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) प्रस्तावित स्थानकासाठी १५२ झाडे तोडण्यासाठी (Tree cutting) ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन’ने परवानगी मागितली आहे. याबाबत महापालिकेने सूचना (Notice) व हरकती मागवल्या असून बुधवारी (ता. १५) सुनावणी होणार आहे. बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी झाडे तोडण्याबाबत शिवसेना (Shivsena role) आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘मेट्रो- ७ अ’साठीही १३९ झाडांचा बळी जाणार आहे.

हेही वाचा: सीएचा निकाल जाहीर; नंदिनी अग्रवाल देशात पहिली

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांनी विरोध केला आहे. शिवसेनेचा तर या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध होता; मात्र काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या महासभेने बुलेट ट्रेनसाठी दिवा येथील भूखंड देण्याची परवानगी दिली. त्यातच आता मुंबईतील स्थानकासाठी झाडे तोडण्यासाठी प्रशासकीय परवानगी मिळण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे आला आहे.

पालिका प्रशासनाकडे हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून सादर झालेल्या प्रस्तावानुसार ११ झाडे तोडण्याबरोबरच १४१ झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. सूचना व हकरती सादर करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून बुधवारी(ता. १५) दुपारी २.३० ते ३ या वेळात भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील उद्यान विभागाच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडला जाणार आहे. त्यात शिवसेनेसह कॉंग्रेस काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मेट्रोसाठी १३९ झाडांचा बळी

मेट्रो ७ अ टप्प्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील १३९ झाडांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यातील ५५ झाडे तोडण्याची आणि ८४ झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी महापालिकेकडे मागण्यात आली आहे. त्यावरही सुनावणी घेतली जाणार आहे.

Web Title: Thane Municipal Bullet Train Diva Land Bkc Tree Cutting Shivsena Role

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..