ठाणे महापालिका आयुक्तांचीही तडकाफडकी बदली! वाचा, नवे आयुक्त कोण आहेत ते?

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 24 June 2020

  • ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी विपिन शर्मा
  • अवघ्या तीन महिन्यात आयुक्त विजय सिंघल यांची बदली 

ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी तीन महिन्यापुर्वी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विपिन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.

 ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

ठाणे महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तडकाफडकी रजेवर गेले होते. त्यानंतर त्यांच्या जागी विजय सिंघल यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यात अवघ्या तीन महिन्यात मंगळवारी त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विपिन शर्मा यांची आयुक्त पदी वर्णी लागली आहे. आयुक्त विजय सिंघाय यांच्या बदलीचे वृत्त शहरात पसरताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Municipal Commissioner also transferred! Read on, who are the new commissioners?