esakal | ठाणे महापालिकेतील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची राजकीय नेत्यांकडे धाव | Thane Municipal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Municipal

ठाणे महापालिकेतील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची राजकीय नेत्यांकडे धाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : महापालिका (Thane municipal) प्रभाग समितीत वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्या १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या (Employee transfer) केल्या आहेत; मात्र त्या कर्मचाऱ्यांनी बदल्या थांबविण्यात याव्यात, यासाठी राजकीय नेत्यांकडे (political leader) धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनादरम्यान (corona) अनधिकृत बांधकामांवरून (illegal buildings) विरोधकांनी रान उठविले होते.

हेही वाचा: चुकीचे गुण देणाऱ्या महाविद्यालयाला २५ हजारांचा दंड

त्यात स्थायी समितीच्या बैठक असो अथवा सर्वसाधारण सभा या दोन्ही सभागृहांत सदस्यांकडून शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चर्चिला जात होता. वारंवार होणाऱ्या टीकेवरून पालिका आयुक्तांनी शहरात नव्याने उभे राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगाही उगारला. त्यानंतर आता आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत बदलीचे हत्यार उपसले. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या विविध नऊ प्रभाग समितीतील तब्बल १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये अतिक्रमण विभागात कार्यरत तब्बल ८५ कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच १०० टक्के बदल्या केल्या.

त्यानुसार सोमवारी आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेशही दिले होते. हजर न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता; परंतु त्यानंतरही सोमवारी महापालिका मुख्यालयात अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या बदल्या थांबविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. येत्या सहा महिन्यांवर पालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशातच या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होईल. तसेच कामेही रखडतील. त्यात त्या कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी रुजू झाल्यानंतर तेथील कामकाज समजून घेण्यासाठी वेळ जाईल आदी करणे देत झालेल्या बदल्या रोखण्यात याव्यात यासाठी राजकीय नेत्यांकडे कर्मचाऱ्यांनी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

loading image
go to top