

Bhiwandi Unauthorized Schools
ESakal
भिवंडी : सरकारच्या अंतिम मंजुरीशिवाय ग्रामीण भागात सुरू असलेल्या आठ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी भिवंडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांकडे आवश्यक शासकीय मान्यता नसतानाही त्या सुरू आहेत, असे पंचायत समितीच्या गटशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पालकांनी आपल्या मुलांना या शाळांमध्ये दाखल करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.