ठाणे पॅटर्नने महाराष्ट्रात भगवं सरकार आणूया : आदित्य ठाकरे

दीपक शेलार
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. या खेपेला महापालिकेतही सेनेला एकहाती सत्ता ठाणेकरांनीच दिली. तेव्हा, ठाणे पॅटर्नने महाराष्ट्रात भगवे सरकार आणूया, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केले.

ठाणे : शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. या खेपेला महापालिकेतही सेनेला एकहाती सत्ता ठाणेकरांनीच दिली. तेव्हा, ठाणे पॅटर्नने महाराष्ट्रात भगवे सरकार आणूया, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केले.

शिवसेनेची राज्यभर सुरु असलेल्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे मंगळवारी (ता.17) ठाण्यात आले होते.त्यावेळी एनकेटी सभागृहात उपस्थितांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.दरम्यान,माध्यमांशी बोलताना आदित्य यांनी खड्डे केवळ ठाण्यात नसून राज्यभरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे सांगत,आता टेंडर सिस्टीम बदलण्यासह ठेकेदारांकडून रस्त्याची हमी घेतली पाहिजे, असे मत मांडले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा राज्यभर सुरु आहे.उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि पालघर येथे यशस्वी यात्रा केल्यानंतर मंगळवारी 100 वा विधानसभा मतदार संघ 'ठाणे' होता.हाच धागा पकडून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनआशीर्वाद यात्रेने ठाण्यात सेंच्युरी मारली असली तरी राज्यभरात आपल्याला सेंच्युरीपेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत.असा आशावाद शिवसैनिकांमध्ये चेतवून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार सेनेचे असतील.

असा विश्वास व्यक्त केला, तर,आदित्य ठाकरे यांनी,मंत्रालयावर भगवा फडकवून भगवे सरकार आणण्याचा निर्धार व्यक्त करताना सेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली.ठाणे महापालीकेतही एकहाती सत्ता दिली. तेव्हा,हाच ठाणे पॅटर्न प्रत्येक गावात, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात न्यायचा आहे.महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी ही जनआशिर्वाद यात्रा काढली असून शिवशाहीमध्ये मंत्रालय जनतेपर्यंत आणण्याची मनीषा बाळगली असल्याचे सांगितले.यासाठी सर्वानी जातीभेद व धर्माची बंधने झुगारून नवा महाराष्ट्र घडवूया, असेही सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Thane pattern will bring the government of shivsena : Aditya Thackeray