Police officer commit suicide
Police officer commit suicide sakal

Crime News : कल्याण मधील धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याचा राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

डोंबिवली - ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली. विकास माने असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सध्या विकास याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून विकास याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज रोडवरील शंकेश्वर कृपा इमारतीमध्ये विकास माने आपल्या कुटुंबासह राहण्यास आहेत. विकास हे ठाणे पोलीस दलात कार्यरत आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास विकास यांनी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Police officer commit suicide
Thane Rain Updates : ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचं थैमान; वाहतूक व्यवस्था ठप्प

घटनेची माहिती मिळताच विकास चे नातेवाईक व त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकास व त्याच्या पत्नीचे वाद सुरू असून विकास यांना वारंवार धमकी व दबाव टाकला जात असल्याने त्याने आत्महत्याचे पाऊल उचलत आरोप विकास यांच्या नातेवाईकांनी केलाय. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करन्याची मागणी पोलिसांनी बॉइज संघटनेचे उमेश भारती यांनी केली आहे.

Police officer commit suicide
Mumbai Local Train : मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा होणार भक्कम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com