esakal | Thane : सहा वाहनांना आग ; तीन वाहने जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

thane

Thane : सहा वाहनांना आग ; तीन वाहने जळून खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : वसंत विहार येथे सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात उभ्या केलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत सहा वाहनांनी पेट घेतल्याची घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तीन वाहने जळून खाक झाली असून यामध्ये एक चारचाकी वाहनासह दोन दुचाकींचा समावेश आहे.

सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली. यामध्ये इतर पाच वाहनांनीही पेट घेतला. वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली.

मात्र आगीवर नियंत्रण मिळवत असताना, तीन वाहने पूर्णपणे जळून खाक झाल्या असून अन्य तीन गाड्यांचे हे या आगीत नुकसान झाले आहे. ही आग दोन चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांना लागली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. तसेच या घटनेत कोणीतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

loading image
go to top