esakal | ठाणे : पावसाची रिपरिप, इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे : पावसाची रिपरिप, इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

ठाणे : पावसाची रिपरिप, इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरात तिसऱ्या मजल्याववरील स्लॅब कोसळून या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे 6 च्या दरम्यान ही घटना घडली असून तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब थेट तळ मजल्यावर कोसळल्याने यामध्ये तळ मजल्यावरील रहिवासी दबले गेले. ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी या तिघांना बाहेर काढले. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर यामध्ये दोघांचा मृत्यू झाला .रमिज शेख(32) आणि गॉस तांबोळी (38)अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

ठाण्यात गेल्या दोन तीन दिवसंपासून पावसाची रिपरिप सुरूच असून ठाण्यात या दोन दिवसात पडझडीच्या घटनाही घडलेल्या आहेत. रोबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही 25 वर्ष जुनी इमारत असून आज पहाटे 6 च्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या अश्फाक वागनी यांचा पूर्ण स्लॅब हा तळ मजल्यावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, फायर ब्रिगेड हे घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील अफवा पसरवतात, त्या वक्तव्याचा राऊतांनी घेतला समाचार

तीन लोकं या स्लॅबखाली दबले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित रेस्क्यू ऑपरेशन करून या तिघांना बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. यापैकी एकाला संजीवनी हॉस्पिटल तर दोघांना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

खत्री अपार्टमेंट ही 25 वर्ष जुनी इमारत असून धोकादायक झालेल्या सी विंग मधील 24 खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. या सर्व कुटुंबातील लोकांचे जवळच्या खांदेशी मस्जिदमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.दरम्यान शहरातील अनेक इमारती या जीर्ण झाल्या असल्याने अशा इमारातींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला आहे.

loading image
go to top