esakal | महिलांसाठी चांगली बातमी, ठाण्यात पालिकेनं उभारली 'पिरियड रुम'
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांसाठी चांगली बातमी, ठाण्यात पालिकेनं उभारली 'पिरियड रुम'

ठाण्यात महिलांसाठी पालिकेनं पिरियड रुम उभारली आहे. त्यामुळे महिलांच्या समस्या यामुळे सुटण्याची शक्यता आहे.

महिलांसाठी चांगली बातमी, ठाण्यात पालिकेनं उभारली 'पिरियड रुम'

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  महिलांना मासिक पाळीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यातच या मासिक पाळीतील समस्यांना तोंड देणाऱ्या महिलांसाठी चांगली बातमी आहे. ठाण्यात महिलांसाठी पालिकेनं पिरियड रुम उभारली आहे. त्यामुळे महिलांच्या समस्या यामुळे सुटण्याची शक्यता आहे. ठाण्यातल्या झोपडपट्टीतल्या महिलांना मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्या सोडवता याव्यात यासाठी एक पिरियड रुम बनवण्यात आली आहे. कशी असेल ही पिरियड रुम जाणून घेऊया. 

ठाण्यात सार्वजनिक शौचालयात ही पिरियड रुम महिलांसाठी बनवण्यात आली आहे. ही रुम महिलांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. सार्वजनिक शौचालयात असा कक्ष बनवण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचं एका ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. 

अशी आहे पिरियड रुम 

या पिरियड रुममध्ये एक कमोड, जेट स्प्रे, टॉयलेट रोल होल्डर, साबण, पाणी याची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त एक कचऱ्याचा डब्बाही रुममध्ये ठेवण्यात आला आहे. 

पालिका अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, अशा प्रकारची रुम निर्माण करण्याचं नियोजन बऱ्याच दिवसांपासून होतं. पालिकेनं एक स्वयंसेवी संस्थेसोबत एकत्र येऊन हा रुम बनवण्यात आला आहे. आज वागळे इस्टेटच्या शांतीनगर भागातील सार्वजनिक शौचालयात ही रुम महिलांसाठी खुली करण्यात आली आहे. या रुमच्या बाहेरील भिंतींवर आकर्षक रंग दिला असून मासिक पाळीच्या काळात काय करावं याचा संदेश देणारी चित्रंही भिंतींवर काढण्यात आली आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, पिरियड केंद्राच्या उभारणीकरिता ४५ हजार रुपयांचा खर्च आला असून ठाणे शहरातील सर्व १२० टॉयलेट्समधअये असे कक्ष बनवण्यात येणार आहेत.  ठाण्यातील झोपडपट्टीमध्ये ज्या महिला राहतात. त्यांची घरं खूप लहान असतात. येथे अंघोळीसाठीही नीट व्यवस्था नसते. मासिक पाळीदरम्यान या महिलांना सॅनिटरी नॅपकिन बदलण्यासाठीही खूप अडचणी येत असतात. त्यामुळे नव्यानं उभारण्यात आलेलं सुविधा केंद्र हे या महिलांसाठी एक वरदान ठरेल असं अधिकाऱ्यांचं मत आहे. तसंच यातून महिलांना स्वच्छतेलाही प्रोत्साहन मिळेल, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Thane slum Period room hygienic sanitary facilities Wagle Estate 

loading image