आधार कार्ड पाहून दिले जात होते 'कोविड निगेटिव्ह' रिपोर्ट्स

क्राईम ब्रँचने केलं दोघांना अटक; महापालिकेच्या रूग्णालयात सुरू होता भयंकर प्रकार
Covid-19 Reports
Covid-19 Reports

कोरोनाच्या काळात RT-PCR आणि अँटीजेन चाचणीचे रिपोर्ट्स यांना खूपच महत्त्व आहे. पण काही लोक या गोष्टींचा गैरवापर करत होते. अशाच एका बनावट RT-PCR रिपोर्ट्सच्या रॅकेटचा ठाण्यातील क्राईम ब्रँचच्या (Crime Branch) युनिट 5 ने पर्दाफाश केला. ठाणे महापालिकेकडून (Thane Municipal Corp) चालवल्या जाणाऱ्या कोविड रूग्णालयात (Covid Hospital) कंत्राटी पद्धतीवर (Contract) काम करणाऱ्या दोघांना या प्रकरणात बेड्या ठोकण्यात (Arrested) आल्या. अफसर मंगवाना (Afsar Mangwana) आणि संकपाल धानवे (Sankpal Dhanve) या दोघांना क्राईम ब्रँचने अटक केली. ठाण्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये बनावट RT-PCR रिपोर्ट्स दिले जात असल्याची माहिती (Tip) पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि या दोघांना रंगेहाथ पकडले. (Thane Two ward boys arrested in fake RT PCR racket case by crime branch)

Covid-19 Reports
"पण आडवा आला अहंकार"; भाजपची सरकारवर बोचरी टीका

"बनावट RT-PCR रिपोर्ट्स देणारे हे दोघे तरूण एका रिपोर्टमागे १२५० रूपये घेत होते. स्वॅब टेस्ट न घेता केवळ आधार कार्डच्या आधारावर या रूग्णालयात बनावट RT-PCR रिपोर्ट्स दिले जात होते. स्वॅबचा नमुना न घेताच स्बॅव स्टीक्स तपासणीसाठी पाठवल्या जात होत्या. त्यामुळे आपोआपच या चाचण्या कोविड निगेटिव्ह यायच्या. क्राईम ब्रँचच्या एका अधिकाऱ्याला असाच खोटा RT-PCR रिपोर्ट देत असताना आम्ही त्या दोघांना रंगेहाथ पकडले आणि बेड्या ठोकल्या. तसेच, अनेक खोटे RT-PCR रिपोर्ट्सही ताब्यात घेण्यात आले", अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com