

Thane ZP launches WhatsApp Chatbot for citizens.
Sakal
ठाणे : नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने अधिकृत व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. +९१ ८९९९१ ५४१४० या क्रमांकावर उपलब्ध असलेली ही सेवा ठाणे डोअरस्टेप डिलिव्हरी पोर्टलशी संलग्न असून, नागरिकांना विविध शासकीय सेवा, योजना, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची सद्यस्थिती तसेच तक्रार नोंदणीची सुविधा आता थेट व्हॉट्सअॅपवरून मिळणार आहे.