ठाणे झेडपीची मुख्य इमारत पडण्यास सुरुवात; दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय; नवीन प्रशासकीय भवन उभे राहणार

राहुल क्षीरसागर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ठाणे जिल्हा परिषदेची शहरातील मुख्य इमारत अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ही इमारत पाडण्यास आजपासून सुरुवात झाली. या ठिकणी नवीन प्रशासकीय बांधण्यात येणार आहे. 

ठाणे, :  स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ठाणे जिल्हा परिषदेची शहरातील मुख्य इमारत अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ही इमारत पाडण्यास आजपासून सुरुवात झाली. या ठिकणी नवीन प्रशासकीय बांधण्यात येणार आहे. 

तीन हजार किलोमीटर अंतर कापून आलेल्या पक्षाचा राज्यात मृत्यू; बोरिवलीच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाची इमारत अतिधोकादायक झाल्यामुळे येथील विविध विभागांची कार्यालये जिल्हा परिषदेच्या शेजारील इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहेत. मुख्य इमारतीतील सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आला. तर इतर विभागांची कार्यालये ही त्याच आवारातील इतर इमारतींमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्यामुळे ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. तसेच या इमारतीतील जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध समितीचे चार सभापती, मुख्यकार्यकारी  अधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग यांची कार्यालये या इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी आता ही इमारत पाडण्यास सुरुवात झाली आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया सोबतंच महाराष्ट्र सरकारनेही सुप्रिम कोर्टात दाखल केली कैविएट - 

 अशी आहे जिल्हा परिषद इमारत
ठाणे जिल्हा परिषदेची मुख्य इमारत 1965-66 मध्ये बांधण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारातील मुख्य इमारतीसह अन्य एका इमारतीला 50 वर्षाहून अधिक काळ झाल्याने या दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट जिल्हा परिषद प्रशासनाने जानेवारी 2017 मध्ये केले होते. मे 2017 मध्ये इमारत धोकादायक झाल्यामुळे ती पाडण्यात यावी, असे  अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून सप्टेंबर 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला. जिल्हा परिषदेकडे दुसरी जागा उपलब्ध नसल्यामुळे या इमारतींची तात्पुरती दुरुस्ती करुन इमारतीचा वापर करण्यात येत होता. दरम्यान दोन ते तिन महिन्यापुर्वी पुन्हा नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधणीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाला शासनाकडून अद्याापही हिरवा कंदील न मिळाल्याने जिल्हा परिषदेने दुसऱ्या ठिकाणी येथील कार्यालये स्थलांतरित केली आहेत.

 

ठाणे जिल्हा परिषदेची मुख्य इमारत  धोकादायक ठरविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात इमारत पडून दुर्घटना होवू नये, यासाठी खबरदारी म्हणून ती पाडण्यास  सुरुवात केली.
हिरालाल सोनवणे,
मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

-----------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane ZP main building begins to collapse; Decisions to avoid accidents; A new administrative building will be erected