अर्णब गोस्वामींना अटक केल्यानं राज्य सरकारचे आभार; अन्वय नाईक कुटुंबियांचे तत्कालीन व्यवस्थेवर गंभीर आरोप

पूजा विचारे
Wednesday, 4 November 2020

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली आहे.त्यांची पत्नी आणि मुलगी अक्षता नाईक हे प्रसार माध्यमांसमोर आलेत. 

मुंबईः रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. अलिबाग पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलीय. अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांची पत्नी आणि मुलगी अक्षता नाईक हे प्रसार माध्यमांसमोर आलेत. 

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानले आहेत. ५ मे २०१८ हा दिवस कधीच विसरु शकत नसल्याचं अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे. चिठ्ठीत नाव लिहून कारवाई होत नव्हती, असंही नाईक यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. 

अर्णब गोस्वामींना अटक केल्यानं आजच्या दिवसासाठी अक्षता नाईक यांनी महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. सुसाईड नोटमधील ३ जणांवर तेव्हा कारवाई झाली नसल्याचंही अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे. 

तसंच अर्णब गोस्वामींनी त्यांना त्यांच्या मेहनतीचा पैसा दिला नाही. पतीला कामाचा पैसा मिळाला असता तर ते हयात असते, असं अन्वय नाईक यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. अर्णब गोस्वामी यांनी सातत्यानं अन्वय नाईक यांना धमक्या देत होते, असंही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.

अर्णब गोस्वामींकडून वारंवार धमकी, अन्वय नाईक यांच्या कन्येनं हा आरोप केला आहे. तसंच ८३ लाखांची रक्कम दिली नसल्याचा आरोपी कुटुंबियांनी केला आहे. जीवे मारण्याच्या धमक्या देऊन पैसे मागण्यासाठी लोकं घरी यायचे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

रिपब्लिक स्टुडिओ हा अन्वय नाईक यांचा शेवटचा प्रोजेक्ट होता. रिपब्लिक स्टुडिओच्या कामाचा पैसा मिळाला नसल्याचा आरोपही नाईक कुटुंबियांनी केला आहे. 

राजकारण करायचं नसून फक्त न्याय हवा असल्याचं नाईक कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसल्याचंही ते म्हणालेत. अर्णबमुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला असल्याचंही नाईक कुटुंबियांनी म्हटलं आहे.  चिठ्ठीत नाव असूनही कुणालाही अटक का झाली नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

तसंच मोदी आणि पीएमओलाही न्यायासाठी पत्र लिहिलं असल्याचंही नाईक कुटुंबियांनी सांगितलं. यापुढे वडिलांसाठी न्यायालयीन लढा देणार असल्याचंही अक्षता नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. 

Thanks state government arrest Arnab Goswami Naik family serious allegations against previous system


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thanks state government arrest Arnab Goswami Naik family serious allegations against previous system

टॉपिकस