पाण्याच्या टँकरमुळे महिलांची पायपीट थांबली

पाण्याच्या टँकरमुळे महिलांची पायपीट थांबली
Published on

कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : कसारा घाटाजवळील गांगडवाडी हे सुमारे ४०० लोकसंख्या असलेले गाव मागील दहा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झाले होते. येथील पाणीटंचाईची माहिती मिळताच कल्याणमधील हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने नागरिकांच्या मदतीने इगतपुरीतून टँकरच्या सहाय्याने पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. तसेच नागरिकांना भेडसावणारी पाणीसमस्या दूर करण्यासाठी शक्य ती मदत देण्याचे आवाहन सचिन राऊत यांनी केले आहे.

सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढत्या तापमानाचा फटका सर्वांनाच बसत आहे. अशातच हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेकडे कसारा येथील गांगडवाडीतील पाणीटंचाईचा व्हिडीओ आला. महिला विहिरीवर सायंकाळी चार वाजता पाण्यासाठी नंबर लावतात; तर शेवटचा नंबर पहाटे चार वाजता लागतो. या वेळी विहिरीत केवळ एक डब्बा पाणी शिल्लक असते. तसेच एक किलोमीटर गावापासून लांब दगडातून हांडे घेऊन महिला जीवघेणा प्रवास करत आहेत. याची दखल घेत हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने पैसे जमा केले. तसेच त्यातून टँकरने पाणी मागवून महिलांना पाणी पुरवले. पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल होत असून शहरातील सर्व नागरिकांनी एकत्रित येत टँकरसाठी शक्य होईल, ती मदत करावी, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com