esakal | गुढीपाडव्याच्या बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत......
sakal

बोलून बातमी शोधा

गुढीपाडव्याच्या बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत......

गुढीपाडव्याच्या बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत......  


मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे गुढीपाडव्याच्या शोभायात्रा रद्द झाल्या असून, लग्नसराईवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भुलेश्‍वर येथील इमिटेशन ज्वेलरीच्या मोठ्या बाजारपेठेतील ग्राहकांचा ओघ दोन दिवसांपासून आटला आहे. 

गुढीपाडव्याच्या बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत......

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे गुढीपाडव्याच्या शोभायात्रा रद्द झाल्या असून, लग्नसराईवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भुलेश्‍वर येथील इमिटेशन ज्वेलरीच्या मोठ्या बाजारपेठेतील ग्राहकांचा ओघ दोन दिवसांपासून आटला आहे. 

हेही वाचा: शाब्बास महाराष्ट्र ! पाच कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण झाले निगेटिव्ह,लवकरच जाणार घरी 

गिरगावात मारवाडी आणि गुजराती समाजांप्रमाणे मराठी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसाठी नऊवारी साड्या आणि फेट्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. तुरेवाले फेटे, पेशवाई व अन्य पगड्या, नऊवारी साड्या, इमिटेशन दागिन्यांना मोठी मागणी असते. पेशवाई, मस्तानी, पैठणी, नऊवारी साड्यांना महिलांची विशेष पसंती असते. यंदा "तान्हाजी' चित्रपटाच्या प्रभावामुळे तानाजी मालुसरे यांच्या पोशाखाची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली होती. 

कोरोना संसर्गाच्या सावटामुळे नागरिकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. शोभायात्रा रद्द झाल्यामुळे रेडिमेड फेट्यांसह साध्या, पेशवाई, मस्तानी, पैठणी आदी नऊवारी साड्यांची निर्मिती थांबली आहे, अशी माहिती भवानी ड्रेसवालाचे चिराग सोनछत्र यांनी दिली. गुढीपाडव्याला 40 ते 50 तुरेवाल्या फेट्यांची ऑर्डर असते. त्यांच्या किमती 500 ते 800 रुपयांपर्यंत आहेत. शोभायात्रा पुढे ढकलण्यात आल्याने नंतर तरी विक्री होईल, अशी आशा असल्याचे अजय सोनछत्र म्हणाले. 

मोठी बातमी: ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील ४ मोठी शहरं बंद राहणार-उद्धव ठाकरे  

कोरोना संसर्गाच्या धोक्‍यामुळे बाजारपेठेतील 90 टक्के विक्री घटल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे इमिटेशन ज्वेलरी आणि कपडे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. इमिटेशन ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भुलेश्‍वर बाजारात लग्नसराई आणि सणासुदीला ग्राहकांची गर्दी असते. सध्या ग्राहकच नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. आर्थिक मंदी असतानाच कोरोनाची संक्रांत आल्यामुळे व्यवसाय पूर्णत: ठप्प होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

काय आहेत व्यवसायिकांच्या प्रतिक्रिया:
 
"कोरोनाच्या भीतीमुळे बाजारपेठेवर 60 ते 70 टक्के परिणाम झाला आहे. घाऊक व्यापारी थोड्याफार प्रमाणात माल घेऊन जातात. ग्राहक येत नसल्यामुळे जुनाच माल विकला जात नाही, त्यामुळे तूर्तास नवीन माल मागवणे बंद केले आहे". असं भूमी ज्वेलर्सचे मालक  संतोष गडेकर यांनी म्हंटलंय.  

"दरवर्षी गुढीपाडव्याला सुमारे 100 नऊवारी साड्यांची विक्री होते. या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आमचे नुकसान झाले आहेच, पण लोकांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे." असं  भवानी ड्रेसवालाचे मालक चिराग सोनछत्र यांनी म्हंटलंय.  

there are no customers even on the occasion of gudhipadwa in markets read full story