ठाण्याचं विभाजन होऊन वेगळा कल्याण जिल्हा होणार का? खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात...

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण जिल्हा वेगळा करावा अशी मागणी गेले कित्येक वर्षे होत आहे.
ठाण्याचं विभाजन होऊन वेगळा कल्याण जिल्हा होणार का? खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात...
Updated on

डोंबिवली - ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण जिल्हा वेगळा करावा अशी मागणी गेले कित्येक वर्षे होत आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांची ही मागणी असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकर निर्णय घ्यावा असे मत त्यांनी नुकतेच मांडले आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मला त्याबाबत काही माहीत नाही. फोन करून त्यांना विचारतो असे उत्तर दिले आहे. कल्याण लोकसभेतील विकासासाठी आग्रही असणारे खासदार डॉ. शिंदे यात आता खरेच लक्ष घालणार का ? हे पहावे लागेल.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात यावे ही मागणी गेले अनेक दशके केली जात होती. दरम्यान 2011 साली मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी जिल्ह्याचे त्रिभाजन करून कल्याण वेगळा जिल्हा करावा अशी मागणी पुढे केली. आघाडी सरकारच्या काळात 2014 ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हाची निर्मिती करण्यात आला. राज्यात महायुतीचे सरकार आले असून उपमुख्यमंत्री पदी अजित पवार व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी त्यावेळी कल्याण जिल्हा स्वतंत्र करण्यात यावा या मागणीला सहमती दर्शवली होती. तत्कालीन पालकमंत्री व आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहमती मात्र यास अद्याप मिळत नाही आहे.

कल्याण जिल्हा कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र होणारच असा ठाम विश्वास कथोरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यात लवकर निर्णय घ्यावा यासाठी आग्रही राहणार असल्याचे देखील कथोरे म्हणाले आहेत. यावर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, मी याबाबत ऐकले नाही. फ़ोन करून त्यांना विचारतो, असे सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण जिल्ह्याचा प्रश्न पुढे आला आहे. त्यामुळे शिंदे सरकार याकडे लक्ष देणार का हे पहावे लागेल.

काय आहे कथोरे यांची मागणी....

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार करावा, अशी मागणी आणि यासाठी पाठपुरावा भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले असून कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलीस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर पडत असून कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होईल, न्याय मिळेल, असे किसन कथोरे म्हणाले.तसेच समितीने अहवालं दिला आहे की कल्याण जिल्हा झाला पाहिले आणि तो होणारच,मुख्यमंत्री याबाबत लवकर निर्णय घ्यावा असे कथोरे यांनी सांगितले.

जिल्ह्यावरील ताण होईल कमी...

राज्य शासनाने नेमलेल्या पिंगुळकर समितीनेसुद्धा ही मागणी अतिशय योग्य असल्याचा अहवाल सादर केला आहे. ठाणे जिल्ह्याचे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने ठाणे जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे असून कल्याण जिल्हा स्वतंत्र झाल्यास ठाणे जिल्ह्यावर पडणारा ताण कमी होईल आणि नागरिकांनाही योग्य न्याय देता येणार आहे.

जिल्हा प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे.त्यामुळे कामाची विभागणी व्हावी यासाठी स्वातंत्र्य जिल्हा हा चांगला पर्याय आहे. या स्वतंत्र जिल्ह्यांमुळे काम सहजपणे होईल आणि नागरिकांनाही योग्य वेळ देणे प्रशासनाला शक्य होईल. - किसन कथोरे, आमदार, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com