मुंबईत गेल्या अर्ध्या तासापासून लाईट गूल, रुग्णालयात एक्सरेसाठी आलेल्या पेशंटचा खोळंबा

पूजा विचारे
Monday, 12 October 2020

मुंबईत गेल्या अर्ध्या तासापासून वीज गेली आहे. दक्षिण मुंबईत दिवसा लाईट गेल्याने विविध रुग्णालयात एक्सरे साठी आलेले पेशंट खोळंबले आहेत.

मुंबईत गेल्या अर्ध्या तासापासून वीज गेली आहे. दक्षिण मुंबईत दिवसा लाईट गेल्याने विविध रुग्णालयात एक्सरे साठी आलेले पेशंट खोळंबले आहेत. संपूर्ण मुंबईत लाईट गेल्यानं सकाळी सकाळी नागरिकांची कामं खोळंबली आहेत. 

रुग्णालयाना तातडीने जनरेटर आणि इंधन पुरविण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहे .किमान आठ तास पुरेल इतका इंधन साठी करुन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.विशेषता आयसीयू सेवेत खंड पडू न देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  टाटा कंपनीच्या ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली आहे आहे. दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होईल, असे पश्चिम रेल्वेने सांगितले.  दरम्यान, बोरिवली ते विरार मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचेही पश्चिम रेल्वेने सांगितले.

 विविध ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे संपुर्ण महामुंबईतील विज पुरवठा खंडीत झाला आहे.त्यामुळे लोकलसेवाही ठप्प झाली असून रुग्णालयातही दैनंदिन सेवा बंद पडल्या आहेत. अनेक भागातील पाणी पुरवठाही खंडीत झाला आहे.

कलवा पडघा आणि खारघर येथील ट्रान्सफरमर मध्ये ट्रीपिॆॆग झाल्याने सकाळी 10:30 वाजल्याच्या सुमारास संपुर्ण महामुंबईचाा विज पुरवठा बंद झाला आहे.लवकरतात लवकर विज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेविज पुरवठा कंपन्यांकडून सांगण्यात आले.

यामुळे सर्वच रुग्णालयाती एक्सरे,एमआरआय मशिंन बंद पडल्याने रुग्णांचे हाल होत आहे.तसेच लोकल सेवाहीी बंद पडली आहे.काही शस्त्रक्रीयांवरही परीणाम होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There has been no light in Mumbai for the last half an hour

Tags
टॉपिकस
Topic Tags: