कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये शुक्रवारी पाणी नाही

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 12 मे 2020

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने डोंबिवली विभागाअंतर्गत येणाऱ्या बारवी गुरुत्व वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने डोंबिवली विभागाअंतर्गत येणाऱ्या बारवी गुरुत्व वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम शुक्रवारी ( ता. 15)  करण्यात येणार असल्याने शुक्रवारी एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, परिसरातील ग्रामपंचायती, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र व तळोजा औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा शुक्रवारी चोवीस तास बंद रहाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no water supply in Ulhasnagar including Kalyan-Dombivali on Friday