सावधान ! म्हणून महिलांच्या हनुवटीवर येतात माणसांसारखे केस, महिलांनी जरा लक्ष देऊन वाचा...

सावधान ! म्हणून महिलांच्या हनुवटीवर येतात माणसांसारखे केस, महिलांनी जरा लक्ष देऊन वाचा...

मुंबई : सध्या फॅशन म्हणून संपूर्ण जगभरात पुरुषांमध्ये दाढीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. दाढी असणारे पुरुष महिलांना अधिक आकर्षक वाटतात असं काही लोकं म्हणतात. थोडक्यात काय तर पुरुषांसाठी दाढी म्हणजे 'घर की खेती' जी कधीही आणि कशीही वाढते. जशी पुरुषांना दाढी येते तसंच महिलांनाही दाढी आली तर? पुरुषांना अशा महिला आवडतील? अशी कल्पनाही करवत नाही ना? मात्र अशीही काही कारणं आहेत ज्यामुळे महिलांनाही दाढी येऊ शकते. हो हे खरं आहे. 

महिलांच्या शरीरातल्या काही समस्यांमुळे महिलांनाही दाढीच्या ठिकाणी म्हणजेच हनुवटीवर आणि गालावर केस येतात. याला वैद्यकीय भाषेत 'हर्सुटिझम' असं म्हणतात. शरीरात जर 'अँड्रोजेन' या पुरुष हार्मोन्सचं प्रमाण जास्त असेल तर महिलांना पुरुषांसारखेच केस येतात. मात्र घाबरून जाऊ नका हे सगळया महिलांमध्ये आढळून येत नाही. महिलांच्या शरीरात काही गोष्टींच्या कमतरतेमुळे किंवा वजन वाढल्यामुळे ही समस्या निर्माण होते. 

(१) कुशिंग सिंड्रोम:

कुशिंग सिंड्रोम हा खूप दुर्मिळ प्रकारचा रोग आहे. कुशिंग सिंड्रोम ही 'कोर्टिसोल' या हार्मोनमुळे निर्माण होणारी समस्या आहे. हा सिंड्रोम ५०,००० पैकी एका व्यक्तीला होतो. यात महिलांच्या शरीरावर भरपूर केस येतात, वजन वाढतं, हाडं आणि स्नायू कमजोर होतात.

(२) वजन:

वाढत्या वजनामुळे महिलांना हनुवटीवर केस येऊ शकतात. वजन वाढल्यामुळे हार्मोन्स अनियंत्रित होतात आणि केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. वजन कमी झाल्याने देखील महिलांना हनुवटीवर केस येतात.  

(३) PCOS - पीसीओएस:

जर महिलांना पीसीओएसची समस्या असेल तर अंडाशयाला सिस्ट म्हणजे छोट्या छोट्या गाठी येतात. याचा परिणाम ओव्ह्युलेशन आणि मासिक पाळीवर होतो. यामुळे मासिक पाळी अनियमित होते. हार्मोन्स अनियंत्रित होतात आणि महिलांच्या शरीरावर जास्त केस येतात.

(४) वाढतं वय: 

महिलांमध्ये वाढत्या वयामुळेही शरीरावर केसांचं प्रमाण वाढत जातं. वय वर्ष ५० नंतर महिलांच्या शरीरावर केसांचं प्रमाण अधिक दिसून येतं. 

मात्र महिलांनो घाबरायची गरज नाही, आपला आहार नीट ठेवा, गरज भासल्यास डॉटरांना भेट द्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.  म्हणजे या सगळ्या गोष्टीवर अधिक सखोल माहिती मिळू शकेल. 

these are the reasons behind growing hairs on women chin read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com