महत्वाची बातमी - धारावीपेक्षा 'या' वॉर्ड मध्ये आहेत अधिक कोविड रुग्ण

महत्वाची बातमी - धारावीपेक्षा 'या' वॉर्ड मध्ये आहेत अधिक कोविड रुग्ण

मुंबई  : धारावीतील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या आकडेवारीमुळे सर्वांच्याच मनात धस्स होते. मात्र धारावीपेक्षा अधिक कोविड रुग्ण असलेले मुंबईत दोन वॉर्ड आहेत. या दोन वॉर्ड पेक्षा धारावीचीच चर्चा अधिक होतांना दिसते.

धारावी ही मोठ्या झोपडपट्ट्यांमधील एक असल्याने तेथील प्रत्येक घटना चर्चेचा विषय बनते. त्यामुळेच धारावीत कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर सर्वांचे लक्ष धारावीकडे लागले. धारावीत दररोज कोविड रुग्णांची तसेच मृतांची संख्या वाढत असल्याने मुंबईत सर्वाधिक कोविडचे रुग्ण हे धारावीमध्येच असल्याचे फसवे चित्र उभे राहिले.

मात्र धारावीपेक्षा अधिक रुग्ण पालिकेच्या 'जी' दक्षिण म्हणजे लोअर परळ, प्रभादेवी , वरळी परिसर आणि 'इ' वॉर्ड म्हणजे भायखळा, आग्रीपाडा या परिसरात मध्ये आहे. सर्वाधिक रुग्णांची संख्या ही 'जी' दक्षिण वॉर्ड मध्ये म्हणजे एकूण 389 इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे कोविडचे रुग्ण हे पालिकेच्या 'ई' वॉर्ड मध्ये आहे. तेथे एकूण 194 रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर धारावीत म्हणजे जी उत्तर विभागात तिसऱ्या क्रमांकाचे रुग्ण सापडले असून तेथील रुग्ण संख्या 171 इतकी आहे.

मुंबई महापालिकेच्या टी, सी, आणि  आर एन या वॉर्ड मध्ये सर्वाधिक कमी कोविडचे रुग्ण आढळले असून तेथे अनुक्रमे 13, 16, 17, असे रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक कमी रुग्ण हे  पालिकेच्या टी या वॉर्ड मध्ये सापडले आहेत.

these wards has more corona cases than dharavi read full story on mumbai corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com