माणुसकीला हरताळ! कार्यकर्त्यांची भाजीवाल्यांकडून हफ्तेखोरी तर, भाजीवाल्यांचीही दामदुप्पट विक्री

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 20 April 2020

  • भाजीविक्रीच्या उपक्रमाला हप्तेखोरीचे ग्रहण
  • लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांचे कमिशन; नवी मुंबई पालिकेच्या उपक्रमाला हरताळ

नवी मुंबई : संचारबंदीच्या काळात भाजीपाल्यासाठी नागरीकांनी बाहेर पडू नये, म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहेत; मात्र सोसायटीतील भाजीपाला विक्रेत्यांकडून कमिशन घेण्याचे काम लोकप्रतिनिधींचे कर्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे महापालिका, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पूढाकारातून सोसायटीत सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला विक्रीच्या उपक्रमाला हप्तेखोरीचे ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक भाजीमागे एक ते दोन रूपयांचे कमिशन ठेवल्याने भाजीविक्रेत्यांनीही भाजीपाल्याचे दर दुपट्ट केले आहेत. महापालिकेमार्फत नेरूळ, बेलापूर, सिवूड्स, सानपाडा, जूईनगर, वाशी, ऐरोली या भागांतील रहीवासी सोसायट्यांमध्ये भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहेत. पुणे, नाशिक, संगमनेर, खेड येथील भागातून थेट शेतामधून सोसायटीत भाजीपाला आणला जात असल्याने ग्राहकांना स्वस्त भाजी उपलब्ध होत आहे. परंतू महापालिकेच्या या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता शहरातील इतर हौशी लोकप्रतिनिधींनीही प्रभागातील सोसायट्यांमध्ये परवानगी घेऊन भाजीविक्री केंद्र सुरू केले आहेत. सोसायटीत विक्रीसाठी आणणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना आणताना आधीच कमिशन वजा करण्याच्या सूचना देण्यात येतात. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

प्रत्येक भाजीच्या दरानुसार दोन ते तीन रूपये आकारले जातात. नंतर दिवसभराच्या एकूण व्यवसायानंतर भाजीवाल्याकडून हप्ता वळता करून घेतला जातो. 
या लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांच्या हप्तेखोरीमुळे स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करण्याच्या मुळ हेतूला हरताळ फासला जात आहे. कार्यकर्त्यांना हप्ता देण्यासाठी भाजीविक्रेत्यांकडून एक ते दोन रूपये प्रति भाजीमागे वाढवले जात आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर असताना सोसायटीतील किरकोळ व्यवसायात भाजीचे दर वाढले आहेत. तसेच कार्यकर्त्यांच्या या हप्तेखोरीपासून काही भाजीवाले कंटाळले आहेत. परंतू सद्या कुठेच धंदा करण्यास वाव नसल्यामुळे नाईलाजास्तव कमिशन देऊन भाजीविक्री करीत असल्याची प्रतिक्रिया एका भाजीवाल्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.  
—————————-
चढे दर
किरकोळ बाजारातील मंडईत 30 ते 35 रूपये प्रतिकिलो टोमॅटो, कांदा 35 ते 40 रूपये, लसूण 40 रूपये पाव किलो, कोथिंबीर 20 रुपये लहान आकाराची जूडी मिळते. परंतू 2 ते 4 रूपये कमिशन काढण्यासाठी सोसायटीतील भाजीवाला 40 ते 45 रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री करतो. 40 ते 45 रूपये किलोने कांदा, 45 ते 50 रूपये पावकिलो लसून, 25 ते 30 रूपये लहान आकाराची कोथिंबीर जूडीची विक्री करीत आहे

they collect commissions from the vegetable vendors


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: they collect commissions from the vegetable vendors