अरे बापरे ! चोराला झाली कोरोनाची लागण, २४ पोलिस आणि कोर्टाचा स्टाफ क्वारंटाईन...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

चोर पोलिसांची चिंता कधी आणि कशाप्रकारे वाढवतील काहीच सांगता येत नाही. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाहीये. त्यातच आता चक्क एका चोराला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई: चोर पोलिसांची चिंता कधी आणि कशाप्रकारे वाढवतील काहीच सांगता येत नाही. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाहीये. त्यातच आता चक्क एका चोराला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांची आणि कोर्टाच्या स्टाफची चिंता चांगलीच वाढली आहे.

गोरेगाव पश्चिमच्या बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या एका चोराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इथले पोलिस कर्मचारी आणि कोर्टाचे २ कर्मचारी अशा २४ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. २२ वर्षांच्या या चोराला बांगूरनगर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.

तिसरा Lockdown ?  गृहमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत...

या चोराला कोर्टात हजार करण्यासाठी एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी तळोजा जेलमध्ये आणण्यात आलं. मात्र त्याची कोरोनाची टेस्ट झाली नसल्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याला आत घेण्यास नकार दिला. त्यानंतर कारणात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये हा चोर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना आणि कोर्टाच्या काही कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

पोलिसांची चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे या चोरांचे अजून २ साथीदार होते, जे या चोरीत त्याच्यासोबत सामील होते. ते दोघंही पळून गेले आहेत. त्यांना हि कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस या दोघांचाही युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या पळून गेलेल्या चोरांमुळे इतर नागरिकांना कोरोनाचा धोका आहे.

Big News - पोलिसांसाठी सर्वात मोठी बातमी, निवृत्तीच्या उंबरठ्यावरील मुंबई पोलिसांना मिळणार....

एकूणच या चोरांनी पोलिसांची आणि मुंबईच्या प्रशासनाची चिंता अधिकच वाढवली आहे. त्यामुळे तळोजा जेलमध्ये येणाऱ्या सर्व कैद्यांची कोरोनाची टेस्ट करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

thief detected corona positive 24 police officials and court staff is now under quarantine  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thief detected corona positive 24 police officials and court staff is now under quarantine