
चोरट्यांनी लोकलमध्ये महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला; दोघांना बेड्या
डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan railway station) दोन लोकल उभ्या असताना एक महिला लोकलच्या खिडकीत मोबाईलवर बोलत उभी होती. याचा फायदा घेत दुसऱ्या लोकलमधील दोन चोरट्यांनी (Mobile robbery) त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांत (kalyan railway police) तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्ही व गुप्त बातमीदारामार्फत मुंब्रा येथून (culprit arrested) दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा: ठाणे : शिवसेना-राष्ट्रवादीत श्रेयवादावरुन पुन्हा संघर्षाची ठिणगी
कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 ए वर मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल उभी होती. तर फलाट क्रमांक दोनवर आसनगावच्या दिशेने जाणारी लोकल उभी होती. आसनगाव कडे जाणाऱ्या लोकल च्या विंडो सीटजवळ एक महिला मोबाईलवर बोलत होती. फलाट क्रमांक दोनवर असलेल्या चोरट्यांची नजर त्या महिलेच्या मोबाईलवर होती. मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सुरु झाली याचाच फायदा घेत चोरट्यांनी आसनगाव लोकलमध्ये बसलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि मुंबई दिशेला जाणाऱ्या लोकलमधून पळ काढला.
याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने आणि पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने चोरट्यांचा शोध सुरु केला. सीसीटिव्ही आणि गुप्त बातमीदार यांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली. आवेश सिद्धीकी आणि जाहीद हुसेन अन्सारी अशी दोघा चोरट्यांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
Web Title: Thief Robbed Mobile Phone Of A Woman In Local Train Two Culprit Arrested In Robbery Crime Kalyan News Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..