Mumbai Crime: झटपट पैशांसाठी चोरांनी सतरा लाखांचा जेसीबी पळविला

 Mumbai jcb Crime
Mumbai jcb Crimesakal

Andheri: झटपट पैशांसाठी सुमारे सतरा लाखांचा जेसीबी पळविणार्‍या तिघांना आंबोली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद रशीद शेख, तबरेज शेख आणि शफी शेख अशी या तिघांची नावे असून पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 Mumbai jcb Crime
Andheri Gokhel Bridge : अंधेरीच्या गोखले ब्रीजसाठी पालिकेकडून वर्क ऑर्डर आठवड्यातच

या तिघांकडून चोरी केलेला जेसीबी जप्त केला आहे. किशोर नामदेव राठोड हे गोरेगाव येथील शास्त्रीनगर परिसरात राहतात. ते एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांचा कंपनीचा सतरा लाखांचा एक जेसीबी त्यांनी अंधेरीतील न्यू लिंक रोड, गौरव हाईटससमोरल मेट्रो स्टेशनजवळ पार्क केला होता. हा जेसीबी ११ सप्टेंबरला अज्ञात चोरट्याने पळवून नेला होता.

हा प्रकार दुसर्‍या दिवशी उघडकीस येताच त्यांनी आंबोली पोलिसांत जेसीबी चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून एपीआय हरी बिरादार व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद रशीदला ताब्यात घेतले होते.

 Mumbai jcb Crime
Andheri Election : 'या' 5 कारणांमुळे ऋतुजा लटकेंचा विजय

त्याच्या चौकशीत त्यानेच हा जेसीबी चोरी केल्याचे उघडकीस आले. याकामी त्याला तबरेज शेख आणि शफी शेख यांनी मदत केली होती. चोरीचा जेसीबी विक्रीसाठी ते बीड येथून घेऊन गेले होते. त्यासाठी पेट्रोलची गरज असल्याने त्यांनी जेसीबीचा पार्टची दिड लाखांमध्ये विक्री केली होती. त्यानंतर ते जेसीबी घेऊन बीडला गेले होतै.

ही माहिती उघडकीस येताच पळून गेलेल्या तबरेज आणि शफी या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा जेसीबी हस्तगत केला आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मोहम्मद रशीद आणि तबरेज यांच्याविरुद्ध दोन तर शफीविरुद्ध एका गुन्ह्यांची नोंद असल्याचे एपीआय हरी बिरादार यांनी सांगितले.

 Mumbai jcb Crime
Andheri Bypolls Election: अडथळ्याची शर्यत जिंकत ऋतुजा लटकेंनी उघडलं ठाकरे गटाचं खातं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com