esakal | आज अधिवेशनाचा तिसरा दिवस, आज विरोधक कोणकोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार?
sakal

बोलून बातमी शोधा

आज अधिवेशनाचा तिसरा दिवस, आज विरोधक कोणकोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार?

र्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी वैधनानिक विकास महामंडळावरून मोठा गदारोळ घातला.

आज अधिवेशनाचा तिसरा दिवस, आज विरोधक कोणकोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार?

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी वैधनानिक विकास महामंडळावरून मोठा गदारोळ घातला. दुसऱ्या दिवशी विजेच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यात आलं. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक मराठा आरक्षण मुद्यांवरून सरकारला विधान परिषदेत घेरण्याची शक्यता आहे. तसंच विरोधक मराठा आरक्षण मुद्दयावर आक्रमक राहतील. 

लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला होता. मात्र वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्याची मोहिम महावितरणने सुरू केली आहे. तसंच कोरोनात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडलं जातं असा आरोप करत भाजपचे आमदार आक्रमक झाले होते. 
आणि त्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन केलं. 

यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह भाजपचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. तसंच कामकाजाला सुरुवात होण्याच्या आधी वीजदरवाढीविरोधात भाजप आमदार राम सातपुते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी अंगावर बल्ब, वीजपंप लावून विधिमंडळ परिसरात प्रवेश केला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अजित पवारांकडून मोठी घोषणा

दरम्यान काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मोठी घोषणा केली. वीज कनेक्शन तोडलं जाणार नसल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी विधानसभेत केली.  तसंच  ऊर्जा विभागाकडून याची सविस्तर माहिती दिली जाईल, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवण्यात येत आहे, अशी घोषणा त्यांनी केली. 

Third day of maharashtra budget session 2021 maratha reservation