हे सरकार फेब्रुवारी पाहणार नाही; राऊतांच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, तुमच्या नाकाखालून...

Devendra Fadnavis and Sanjay Raut
Devendra Fadnavis and Sanjay RautDevendra Fadnavis and Sanjay Raut

मुंबई - महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद चिघळला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सूचक इशारा दिला. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.  ( Devendra Fadnavis news in Marathi)

Devendra Fadnavis and Sanjay Raut
Prakash Ambedkar : राष्ट्रवादीवरचे शिंतोडे शिवसेना स्वत:वर का घेतेय; आंबेडकरांचा सवाल

संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना म्हटलं की, आजच्या विराट मोर्चाने राज्यपाल कोश्यारींना डिसमीस केलं आहे. या मोर्चाने इशारा दिलाय की, शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी पाहणार नाही. तसेच फेब्रुवारीच्या आधी सरकार कोसळेल, असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Devendra Fadnavis and Sanjay Raut
Mumbai Fire : घाटकोपरमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; बचावकार्य जोमाने सुरु

दरम्यान राऊत यांच्या टीकेला फडणवीस यांनी खास शैलीत उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, ज्यांना स्वत:चं सरकार टीकवता आलं नाही, त्यांच्या नाकाखालून आम्ही सरकार घेऊन गेलो. आम्ही सरकार तयार केलय. हे कशाच्या वल्गना करतात. आमचं सरकार टीकणार, एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहणार आणि त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवणार आणि आम्ही परत येणार, असा दावा फडणवीस यांनी केला.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. भाजपमधील नेत्यांना बौधिक दारिद्र्य आलं आहे. या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com