

MP Dr. Shrikant Shinde
ठाणे - २०१९ मध्ये हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेलेलेच आता हिंदुत्वाचा आव आणत जनतेसमोर जात असल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. शुक्रवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिशा बैठकीसाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.