महड परिसरात कोंबड्यांचे हजारो किलो मांस उघड्यावर! ग्रामस्तांमध्ये भीतीचे वातावरण

मनोज कळमकर
Tuesday, 12 January 2021

खालापूर तालुक्‍यातील महड परिसरात कोंबड्यांचे हजारो किलो मांस पडले होते. बर्ड फ्लूचे संकट असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मांस दिसल्याने प्रशासनाही चक्रावले आहे

खालापूर  : तालुक्‍यातील महड परिसरात कोंबड्यांचे हजारो किलो मांस पडले होते. बर्ड फ्लूचे संकट असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मांस दिसल्याने प्रशासनाही चक्रावले आहे. ग्रामस्तांनी या प्रकारामुळे भीत व्यक्त केली आहे. 
महड परिसरात मोठ्या प्रमाणात मांस पडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पशुवैद्यकीय अधिकारी पी. एन. गायकवाड, खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे, तलाठी रणजित कवडे, उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी कचऱ्यात टाकलेले मांस म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे नमूद केले. याबाबत तक्रार दाखल करण्यात येणार आहे, असे सांगितले. 

 

या मांस साठ्याचा पंचनमा केला आहे. पशुवैद्यकिय अधिकारी गायकवाड यांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविणार असल्याचे सांगितले. 

 

खालापूर नगरपंचायत हद्दीत बेकायदा मांस टाकण्यात आले आहे. कोणतीही परवानगी न घेता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून संबधित व्यक्तींविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहे. कठोर कायदेशीर कारवाई मागणी नगरपंचायत करणार आहे. 
- सुरेखा भणगे शिंदे,
मुख्याधिकारी, खालापूर 

 

सध्या बर्ड फ्लूची साथ असल्याने महड परिसरात सापडलेल्या मांसाचे नमूने तपासणीसाठी पाठविणार आहे. बर्ड फ्लूचा फैलाव होउ नये यासाठी सतर्क आहोत. 
- पी. एन. गायकवाड,
पशुवैद्यकीय अधिकारी, खालापूर 

Thousands of kilos of chicken meat exposed in Mahad area fear among the villagers

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of kilos of chicken meat exposed in Mahad area fear among the villagers